Home स्टोरी गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ! तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार.

गोळवण धनगरवाडी रस्ता कामाचा शुभारंभ! तांडावस्ती विकास निधीसाठी भाजपचे मानले आभार.

77

मसुरे प्रतिनिधी: गोळवण धनगरवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सदरचा रस्ता तांडावस्ती निधीमधून ५ लक्ष विकास निधी मधून होणार आहे. सदर रस्ता कामाचा शुभारंभ माजी सरपंच श्री. आभा परब यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री.शरद मांजरेकर ,ग्रामपंचायत सदस्य श्री. गावडे सर,प्राजक्ता चिरमुले, तसेच श्री.संजय पाताडे, नंदू नाईक, भाई चिरमुले, दत्ताराम परब, काशिराम गोळवंकर ,सुभाष गोळवणकर, अमित घाडी,बबन वरक,नामदेव वर क, जानू वरक,लक्ष्मण खरात,आप्पा खरात,पांडू वरक व इतर समाज बांधव उपस्थित होते.

सदरचे काम मंजूर करणेसाठी पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण,खासदार श्री.नारायणराव राणे, माजी खासदार श्री.निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले. उपस्थित गोळवण ग्रामस्थांनी विकास निधीसाठी आभार मानले आहेत.