Home स्टोरी गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून निघाली विजयनगर ते वर्तकनगर, ठाणे भव्य साई पायी...

गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून निघाली विजयनगर ते वर्तकनगर, ठाणे भव्य साई पायी पालखी!

159

कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – गौरी विनायक बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्सचे संचालक संजयशेठ गायकवाड यांचे सहकारी आणि साई भक्त संजय नागेश शिर्के यांच्या प्रमुख आयोजनाने गुरुपौर्णिमे निमित्त कल्याण पूर्वेतून विजय नगर ते वर्तकनगर ठाणे या दरम्यान भव्य साई पायी पालखी यात्रा काढण्यात आली. या यात्रेत अनेक मान्यवरांसह साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कल्याण पूर्वेतील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या शिव साई मित्र मंडळ हे या वर्षी २१ व्या वर्षात पदार्पण करीत असून या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या वर्षीच्या पालखी सोहळ्यात साई बाबांची प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आली होती .
या पायी पालखी सोहळ्याच्या प्रारंभी विजय नगर – गवळी नगर, सुनिता कॉलनी येशील संजय शिर्के यांच्या निवास स्थानासमोर असलेल्या साई मंदिरात मंडळाचे आधारस्तंभ संजयशेठ गायकवाड यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून साई बाबांच्या आरतीत सहभाग घेत साईंचे सपत्नीक दर्शन घेतले.

आमदार श्री गणपत गायकवाड तसेच संजयशेठ गायकवाड दांपत्यांच्या शुभहस्ते साई बाबांची आरती घेण्यात आल्यानंतर या पालखीचा मोठ्या दिमाखात प्रारंभ करण्यात आला. ही भव्य साई पायी पालखी ठाणे येथील वर्तक नगर साई मंदीर येथे जावून या ठिकाणी या पायी पालखीचा समारोप करण्यात आला. या भव्य दिव्य अश्या साई पायी पालखी सोहळ्यात घोडेस्वार, बैलगाड्या, लेझीम पथिक, गोंधळी वाद्य, वारकरी संप्रदाय पथक साई चरित्रावर आधारीत चित्र रथ यांच्या सह विविध संस्था संघटना सहभागी झाल्या होत्या. या पालखी सोहळ्यात कल्याण पूर्वेतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून साई बाबांच्या पालखीचे दर्शन घेतले.

गुरुपौर्णिमेच्या मंगलमय दिनी निघालेल्या या भव्य साई पालखी सोहळ्यात माजी नगरसेवक देवानंद गायकवाड, उद्योगपती संजयशेठ गायकवाड, आमदार गणपत गायकवाड, प्रदिप गायकवाड, विश्वनाथ गायकवाड, संजय मोरे, कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख, उल्हास नगर महापालिकेच्या माजी महापौर लिलाबाई आशान आदी मान्यवर सहभागी झाले होते. साई भक्त संजय शिर्के यांच्या प्रमुख आयोजनाने आयोजित करण्यात आलेल्या या साई पायी पालखी सोहळ्यास परिसरातील साई भक्तांचाही उत्सुर्त असा प्रतिसाद लाभला.