Home स्टोरी गुटख्‍याच्‍या अवैध वाहतुकीसाठी वापरलेली वाहने शासकीय मालमत्ता होणार!

गुटख्‍याच्‍या अवैध वाहतुकीसाठी वापरलेली वाहने शासकीय मालमत्ता होणार!

50

सिंधुदुर्ग: गुटख्‍याच्‍या अवैध वाहतुकीसाठी वापरण्‍यात येणारी वाहने शासकीय मालमत्ता म्‍हणून घोषित करण्‍याचा निर्णय महाराष्‍ट्र शासनाकडून घेण्‍यात येत आहे. याविषयी सविस्‍तर प्रस्‍ताव सिद्ध करण्‍याची सूचना अन्‍न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिली आहे. याविषयी अन्‍न आणि औषध प्रशासनमंत्री संजय राठोड यांनी १८ एप्रिल या दिवशी मंत्रालयामध्‍ये संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली.वर्ष २०१२ पासून राज्‍यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी, खर्रा आणि अशा प्रकारच्‍या तत्‍सम पदार्थांचे उत्‍पादन, साठा, वितरण, वाहतूक आणि विक्री यांवर प्रतिबंध आहेत. यापूर्वी या पदार्थांच्‍या वाहतुकीसाठी वापरण्‍यात येणारी वाहने पोलीस कह्यात घेत होते. त्‍यानंतर न्‍यायालयात अर्ज केल्‍यावर ही वाहने पुन्‍हा प्राप्‍त होत होती; मात्र शासन निर्णयानंतरही ही वाहने कायमस्‍वरूपी शासकीय मालमत्ता म्‍हणून रहाणार आहेत. गुटख्‍याच्‍या अवैध वाहतुकीला आळा घालण्‍यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्‍यात येणार आहे.