सत्ता कुणाचीही असो, सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट असे दोन गट नेहमी पहायला मिळतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र हे सुरूच असतं. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांनी आरोप प्रत्यारोप करणे हे काही आपल्या देशात नवीन नाही आहे. सत्ता मिळवण्यासाठी आरोप प्रत्यारो हे करावेच लागतात असा जणू काय काय राजकारणाचा एक नियमच झालेला आहे. त्यातच शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट स्थापन झाले आणि महाराष्ट्र राज्यात विकास कमी आणि आरोप प्रत्यारोपांचे काम जास्त होताना दिसत आहे. असं आरोप प्रत्यारोप एकमेकांवर टीका करण्याचं सत्र सुरु असतांना काही नेते, काही राजकीय पुढारी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप आणि टीका करायला मिळालेली एकही संधी सोडत नाहित.आत्ताच प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. काय म्हणाले गिरीश महाजन? माझ्यामुळेच जिल्हा आणि सहकार आहे असा खडसेंचा गैरसमज होता. बँकेत, दूध संघात, विधानसभेत आणि जिल्ह्यातही मीच हा खडसेंचा अहंमपणा जास्त होता. तो आता उतरला आहे. माणूस जास्त हवेत उडायला लागला, तर किती खाली जोरात आपटतो, यापेक्षा दुसरं उदाहरण असू शकत नाही. भाजपात असताना खडसे म्हणायचे सर्व माझ्यामुळे आहे. पक्षातून बाहेर पडल्यानंतर स्वत:चा मतदारसंघ खडसेंना टिकवता आला नाही. तिथे ते निवडून येऊ शकत नाही. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. आता कुठे येऊन पडलेत? दूधसंघाच्या निवडणुकीत खडसेंच्या पॅनेलचं कोणीच निवडून आलं नाही. मागील वर्षी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाजपाने बहिष्कार टाकला होता. तेव्हा खडसेंनी आमच्यावर टीका-टीप्पणी करत, मीच कसा बाहुबली आहे? हे दाखवलं होतं. आता वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाने त्यांना जागा दाखवली. असं गिरीश महाजन प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले.