Home Uncategorized गांधीनगर येथील नळयोजनेच्या कामाला सुरूवात….

गांधीनगर येथील नळयोजनेच्या कामाला सुरूवात….

79

कणकवली : भिरवंडे गांधीनगर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेअंतर्गत जवळपास ८० लाखाची नळ योजना मंजूर झाली आहे. या योजने अंतर्गत गांधीनगर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दोन उद्धव विहिरी दोन पाणी साठवण टाकी बांधण्यात येणार आहेत. तसेच पाईपलाईनचे ही काम होणार आहे. या अंतर्गत गावातील खालचीवाडी गोपाळकांचे घर येथील संदेश सावंत यांनी दिलेल्या जमिनीमुळे उद्भव विहिरीचे काम सुरुवात करण्यात आले आहे. भिरवंडे सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन शेखर सावंत यांच्या प्रयत्नाने विहिरीसाठी जमीन उपलब्ध करण्यात आली. या जमिनीमध्ये आज भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेंद्र सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच मंगेश बोभाटे, सदस्य तुषार सावंत, मंजुषा बोभाटे, प्रसन्न सावंत यांच्यासह बंडू सावंत, शेखर सावंत, महादेव बोभाटे, अनिल कोचरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या नळ योजनेसाठी दुसरी विहीर ओझर परिसरात प्रस्तावीत आहे. यासाठी श्रावण मेस्त्री यांनी जमीन दान केली आहे. तर पाणीसाठव टाकीसाठी खरलवाडीतील सुर्यकांत सावंत यांनी जमीन दिली आहे. तसेच सध्याच्या नळ योजनेच्या ठिकाणी दुसरी पाणीसाठवण टाकी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत प्रस्तावीत आहे. ग्रामपंचायत क्षेत्रातील खालचीवाडी, खरलवाडीसाठी स्वतंत्र नळ योजना तर उर्वरित मधलीवाडी, होवळेवाडी, वरचीवाडी यासाठी स्वतंत्र नळयोजना तयार करण्यात आली आहे.