सावंतवाडी प्रतिनिधी: – गांधर्व महाविद्यालय मिरज/मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पखवाज वादन परीक्षेत सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील कु संकेत सीताराम म्हापणकर याने यश संपादन केले आहे. पखावज अलंकार महेश विठ्ठल सावंत ( ता . कुडाळ आंदुर्ले )यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या कु संकेत सीताराम म्हापणकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या पखवाज वादन विशारद पूर्ण परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. या यशा बद्दल संचालक डॉ. दादा परब आणि भजन सम्राट बुवा भालचंद्र केळुसकर यांनी अभिनंदन केले. कुमार संकेत यास विशारद परियांतच्या प्रवासाबद्दल विचारले असता प्रथम गुरु आपले आई वडील यांचे माझ्या संगीत क्षेत्रासाठी साथ व मार्गदर्शन लाभले तसेच माझे गुरुजी पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत (आंदुर्ले) लाखमोलाचे मार्गदर्शन केले. कुमार संकेत म्हापणकर पखवाज वादन बरोबर इतर तालवाद्य जसे ढोलकी ,ढोलक, संबळ , पंजाबी ढोल, अरेबियन दरबुका वाद्य , इत्यादी वाद्य सहजरीत्या वाजवतो. पखवाज विशारद या यशाबद्दल प्रसिध्द भजनी बुवा विजय माधव, एच बी सावंत, मधुर पडवळ (मुंबई) यांनी अभिनंदन केले.
Home स्टोरी गांधर्व महाविद्यालय मिरज/मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पखवाज वादन परीक्षेत संकेत...