‘पाकिस्तानी क्रिकेटर द्वारा जिहादला समर्थन !’ या विषयावर विशेष संवाद !
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिझवान याने पाकिस्तानचा विजय ‘गाझा’ येथील मुसलमानांना समर्पित केला. क्रिकेट विश्वचषकामध्ये इस्लामविषयीचा हा प्रचार पाहून खेळामध्ये ‘इस्लामिक जिहाद’चा प्रचार थांबला पाहिजे आणि तिथे फक्त खेळच झाला पाहिजे’, या आशयाची तक्रार मी ‘आय.सी.सी.’ (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आणि ‘बी.सी.सी.आय.’ (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याकडे केली आहे. खेळाला खेळ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! ८० कोटी हिंदूंची लोकसंख्या असलेल्या ऋषीमुनींच्या भारतभूमीवर कोणी जिहाद आणि आतंकवादाची भाषा करत असेल, तर त्याला प्रत्येक हिंदू कडाडून विरोध करेल, असे स्पष्ट प्रतिपादन सामाजिक कार्येकर्ते आणि सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारा जिहादला समर्थन !’ या विशेष संवादात बोलत होते.
अधिवक्ता विनीत जिंदाल पुढे म्हणाले की, फक्त क्रिकेटच नव्हे, फुटबॉल, ‘यू.एन्.ओ.’सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘इस्लाम’ ताकदवान आणि मोठा आहे, हे दाखवायचा प्रयत्न करून अन्य धर्मीयांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पाकिस्तानी खेळाडू क्रिकेटच्या मैदानात नमाज पडतात. मी तक्रार केल्यानंतर गेल्या १० दिवसांत मला पाकिस्तान, तुर्किये आदी देशांतून ६० हून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत. ‘आमचा विरोध खेळाच्या धार्मिकीकरणाला आहे’, हे यांनी लक्षात घेतले पाहिजे.
यावेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे म्हणाले की, वर्ष १९८२ पासून ते आता २०२३ पर्यंत पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारताशी क्रिकेट खेळण्याला ‘जिहाद’शी जोडले आहे. श्रीकांत, गांगुली, इरफान पठाण यांसारख्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तानविरुद्ध खेळतांना हल्ले, दगडफेक यांना सामोरे जावे लागले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हैद्राबादमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लागतात, तेव्हा येथील ‘सेक्युलरवाद्यां’ना आनंद होतो; मात्र अहमदाबादमध्ये जेव्हा ‘जय श्रीराम’चा जयघोष होतो, तेव्हा त्यांना दुःख होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू मैदानात नमाज पढतात, ‘अल्ला-हू-अकबर’चे नारे देतात, गाझा येथील आतंकवाद्यांचे समर्थन करतात, यावर ‘आय.सी.सी.’ने कारवाई केली पाहिजे आणि जिहाद समर्थकांच्या खेळण्यावर बंदी आणली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.