त्रिशूर (केरळ): जिल्ह्यातील थिरुविल्वमला येथे झालेल्या धक्कादायक घटनेत एका ८ वर्षीय मुलीचा झोपून मोबाईलवर खेळ खेळत असतांना मोबाईलचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी मोबाईल नमुने अन्वेषणासाठी पाठवले आहेत. आदित्यश्री असे मुलीचे नाव असून ती तिसर्या इयत्तेत शिकत होती. २४ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. त्या वेळी घरात केवळ मुलीची आजी उपस्थित होती. मृत मुलीच्या वडिलांकडून समजले की, त्यांनी ३ वर्षांपूर्वी ‘रेडमी नोट ५ प्रो’ नावाचा वापरलेला (सेकंड हँड) मोबाईल विकत घेतला होता.