मानवता विकास परिषद ही संस्था म्हणजे काय? असेल याचा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण ही संस्था म्हणजे एक देश व्यापी चळवळ आहे. या चळवळीचा मोठा फायदा खेड्या पासून चालू होणार आहे. कारण खेड्याचा विकास म्हणजे राष्ट्रविकास! आणि म्हणूनच या चळवळीत आपण सहभागी होऊन राष्ट्र विकासाला आणि पर्यायाने आपल्या स्वतःच्या विकासाला यातून चालना मिळणार आहे.देश स्वतंत्र होऊन आज ७५ वर्ष झालीत. परंतु आपला समाज अजूनही दुभंगला आहे. याची कारणे विविध असतील पण समाज समोर आज विविध समस्या उभ्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या , बेकारी, विविध प्रकारच्या सेवांची कमतरता, तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनते पर्यंत पोहोचत नाहीत.विकासाचे निश्चित धोरण नाही आहे. आणि म्हणूनच या सर्व समस्या बाबत समाज प्रबोधन करण्यासाठी देशव्यापी चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कोरोना नंतरचा काळ खूप कठीण बनत चालला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, त्यामुळे गावा गावात छोटे छोटे रोजगार निर्माण होण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यातून रिकाम्या हाताना रोजगार प्राप्त होणार आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक घडी विस्कटलेली असताना येत्या दोन वर्षात कुठल्याही निवडणूक देशात होता कामा नये. आणि ते देशाला परवडणारे सुद्धा नाही आहे. यादृष्टीने व्यापक जनप्रबोधन होणे तितकेच महत्वाचे आहे. आज समाज विखुरलेला आहे. हा समाज संघटित झाला पाहिजे. यासाठी विकासाची चळवळ मानवता विकास परिषद या संस्थेने सुरू केली आहे. विकासाची चळवळ तुम्ही सर्वांनी आपल्या गावातून चालू केली तर खऱ्या अर्थाने विकास होईल. खऱ्या अर्थाने समृद्धी नांदेल. आपले खेडे समृद्ध झाले तर देश समृद्ध होणार आहे. आणि म्हणूनच आम्ही ही चळवळ उभी केली आहे. यात तुम्ही सुद्धा सहभागी व्हावे ही अपेक्षा आहे.आपल्या गावातून तरुणांना रोजगार कसा मिळेल , शेतकरी सधन कसा होईल, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काय करता येईल यासाठी आपण उपक्रम राबविणे ही काळाची गरज आहे. तंज्ञाच्या मदतीने प्रत्येक क्षेत्रात क्रांती कशी घडवता येईल याचा अभ्यास करून आपल्या खेड्याचा प्रथम विकास करण्याचा आपण प्रयत्न करूया. आपला रोजगार आपणच निर्माण करून ही सर्व स्तरातील चळवळ देशव्यापी करूया! यात आपल्या सहभागाची गरज आहे. विशेषतः तरुण वर्गाने या राष्ट्र कार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
आपला नम्रश्री. श्रीकांत विठ्ठल सावंत,अध्यक्ष मानवता विकास परिषद, मुंबई. संपर्क : श्रीकांत विठ्ठल सावंत, सी 305, मथुरा भवन, दादासाहेब फाळके रोड, दादर(पूर्व), मुंबई 400014. मोबाइल- 9967050733