Home स्टोरी खूप साधेपणा जपणारा आधुनिक विचाराचा तरुण उद्योजक लक्ष्मण सावळकर!

खूप साधेपणा जपणारा आधुनिक विचाराचा तरुण उद्योजक लक्ष्मण सावळकर!

60

संदीप जगताप: रविवार दिनांक ९ एप्रिल रोजी मॅग्नस या द्राक्ष निर्यात कंपनीला भेट दिली. लक्ष्मण सावळकर या तरुण उद्योजकाची काही दिवसापूर्वीच भेट झाली होती. पहिल्या भेटीतच या माणसांमध्ये असणारी शेतकऱ्यांबद्दलची तळमळ व व्यवसायातील प्रामाणिकता माझ्या नजरेतून सुटली नाही. आज या कंपनीला भेट दिल्यानंतर त्यांनी संपूर्ण मॅग्नस कंपनी चा कारभार फिरून दाखवला.कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास न करता किती छान काम करता येतं. हे मी आज बघितलं. 1 हजार कोटीकडे वाटचाल असणाऱ्या कंपनीचा तरुण मालक खूप साधा राहतो. व्यवसायात आधुनिकता व राहण्यात साधेपणा यातूनच कंपनीचा नफा वाढत जातो हे रहस्य मला आज उमगलं. सर मी कुठलंही व्यसन करत नाही.दोन वर्षे नवीन कपडे विकत घेत नाही. कारण आधीचे फाटत नाही.डिझेल सोडून हजार पंधराशे रुपये सुद्धा मला वैयक्तिक खर्च नाही.हे ऐकून माझे डोळे विस्फरले.गावात बंद पडलेल्या सोसायटीचा संचालक सुद्धा कपड्याची इस्त्री मोडू देत नाही.अन लक्ष्मणराव हे काय बोलताय.? नंतर त्यांच्या शिक्षणाचा विषय निघाला ICAR JRF ला देशात 16 व राज्यात 3 ऱ्या क्रमांकाने क्रॅक केलेला हा माणूस.नोकरी न करता एका एक्स्पोर्ट कंपनीत काम केलं व आज एक मोठया द्राक्ष निर्यात कंपनीचा मालक झाला.तरी पाय मातीवर व बोलण्यात स्पस्ट निर्मळ पणा..प्रत्येकाकडे काही चांगलं-वाईट असतं. त्यात चांगलंच चांगलं असणारा माणूस आज भेटला.मित्र म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणून ग्रेट वाटला.

संदीप जगताप प्रदेशाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना