Home स्टोरी “क्रिसमस चेअर सेलिब्रेशन २०२४” हा रंगतदार खाद्य व सांस्कृतिक महोत्सव सावंतवाडीत थाटात...

“क्रिसमस चेअर सेलिब्रेशन २०२४” हा रंगतदार खाद्य व सांस्कृतिक महोत्सव सावंतवाडीत थाटात साजरा.

130

सावंतवाडी प्रतिनिधी: मळगाव येथील माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि साळगाव-कुडाळ येथील जयहिंद कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “क्रिसमस चेअर सेलिब्रेशन २०२४” हा रंगतदार खाद्य व सांस्कृतिक महोत्सव सावंतवाडीत थाटात साजरा झाला

कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे, सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, आणि तरुण भारत संवाद सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे संपादक शेखर सामंत यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचे कौतुक केले. खाद्यप्रेमींसाठी या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉल्सची रेलचेल होती. मॉकटेल्स, शेक्स, कबाब, ग्रील्स, ओरिएंटल डिशेस, पिझ्झा आणि स्वादिष्ट डीझर्ट यांसारख्या पदार्थांवर खवय्यांनी मनसोक्त ताव मारला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेले पदार्थ पाहून पाहुण्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेची भरभरून प्रशंसा केली.संगीत प्रेमींना आकर्षित करण्यासाठी ‘स्वर मिलन’ हा लाईव्ह संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये मराठी, हिंदी, आणि कोकणी गाण्यांचा फ्युजन सादर झाला, ज्यामुळे उपस्थितांचा उत्साह अधिकच वाढला. याशिवाय डीजेच्या तालावर मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी मनसोक्त नाचून या क्षणांचा आनंद लुटला.या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले सांताक्लॉज. सांताच्या आगमनाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उत्साहाचा नवा रंग मिळाला. सांतासोबत सेल्फी घेण्यासाठी आणि डान्स करण्यासाठी तरुणाईने गर्दी केली.

कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळ, आकर्षक विद्युत रोषणाई, आणि बक्षिसांचे वाटपही करण्यात आले. संपूर्ण वातावरण आनंदाने भरलेले होते, आणि उपस्थित प्रत्येकाने कार्यक्रमाचे कौतुक करत हा अनुभव संस्मरणीय असल्याचे सांगितले.