Home स्टोरी क्रिकेटपटू निलेश नाईक यांचे निधन.

क्रिकेटपटू निलेश नाईक यांचे निधन.

113

मसुरे प्रतिनिधी: मसुरे मागवणे येथील रहिवासी प्रसिद्ध क्रिकेटपटू निलेश गुरुनाथ नाईक वय ४६ यांचे काल त्याच्या राहत्या घरी निधन झाले. टेनिस क्रिकेट मध्ये एक यशस्वी फिरकी गोलंदाज म्हणून परिसरात तो प्रसिद्ध होता. सामाजिक कार्यातही नेहमी तो पुढे असायचा. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, बहिणी, काका, काकी पुतणे, पुतणी असा परिवार असून येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन नाईक यांचा तो पुतण्या होय.