Home स्टोरी कौतुकास्पद! आषाढी एकादशीनिमित्त कळसुलकर प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धांचे आयोजन.

कौतुकास्पद! आषाढी एकादशीनिमित्त कळसुलकर प्राथमिक शाळेत वेशभूषा स्पर्धांचे आयोजन.

389

स्पर्धेला पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सावंतवाडी: आषाढी एकादशीनिमित्त कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये दिनांक १५ जुलै २०२४ व १६ जुलै २०२४  रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते.यावेळी पहिली व दुसरी या गटातून ६५ तर तिसरी व चौथी या गटातून ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन दिवस ही स्पर्धा दोन गटांमध्ये संपन्न झाली.

या स्पर्धेत लहान गटातून (१ ली,२, री)पुढीप्रमाणे क्रमांक आले.प्रथम -.स्वराली पांगम, द्वितीय- प्रत्यूश जाधव,तृतीय-प्रसंजीत बिले,उत्तेजनार्थ – दर्श पडते, स्वरांग गावडे, नित्या मडकईकर आणि मोठा गट (३ री,४ थी)- प्रथम – उमेश सावंत, द्वितीय सार्थक वरक, तृतीय सार्थक नाईक, उत्तेजनार्थ-धारा कोरगावकर, सतीश साटम, स्वामिनी कोळी यांनी स्पर्धेत यश संपादन केले.

सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत सर,शिक्षक,पालक,संस्थेचे पदाधिकारी, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर सर यांनी अभिनंदन केले.यावेळी तिसरी व चौथीच्या गटासाठी कलाशिक्षक श्री टेमकर सर यांनी तर पहिली दुसरीच्या गटासाठी महेश पालव सर यांनी परीक्षण केले.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तर संस्थेचे अध्यक्ष, सचिव,सर्व पदाधिकारी, पालक यांचे प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धेचे पालकांमधून व सावंतवाडी परिसरातून कौतुक होत आहे.