रोहा: कोलाड विभागातील चिंचवली गावचे सुपुत्र रोशन येरुणकर यांनी सीएची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली आहे. रोशन येरुणकर यांनी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले .पुढील शिक्षण त्यांनी विरार येथे घेतले . त्यांचे शिक्षण वाणिज्य शाखेत पदवी व पदव्युत्तर असुन जीडीसीए व सेबीद्वारे प्रमाणित रिसर्च ॲनालिस्ट असे झाले असून कोलाड पंचक्रोशीत त्यांनी प्रथम सीए होण्याचा बहुमान मिळवला आहे .याबाबत चिंचवली गावकऱ्यांमध्ये व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शाळकरी व महाविद्यालयीन मुलांसमोर रोशन येरुणकरांनी आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान कोलाड विभाग काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष इंजिनीअर हरिओम भाऊ टाळकुटे यांनी रोशन येरूणकर यांना शुभेच्छा दिल्या असून कोलाड पंचक्रोशीसाठी ही आनंदाची ,कौतुकाची व युवकांसाठी प्रेरणेची बाब आहे .सीए ची परीक्षा ही अत्यंत कठीण असून त्यात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे.सीए येरुणकर यांनी पंचक्रोशीत आदर्श निर्माण केला आहे.यावेळी सीए रोशन येरुणकर यांनी सांगितले की ही परिक्षा अर्थातच ज्ञानाच्या कठोर चाचणीची परिक्षा घेणारी ठरते परंतु शिस्त व अभ्यासात सातत्य असल्यावर व आकलनक्षमता विकसित केल्यावर यश हमखास मिळते असे सीए रोशन येरुणकर यांनी सांगितले तसेच पंचक्रोशीतील ज्या विद्यार्थ्यांना सीए परिक्षेसाठी तयारी करायचीय त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असेन असे ते बोलायला विसरले नाहीत.तसेच यशाचे श्रेय आई-वडील,पत्नी , मित्र मंडळी व त्यांच्यावर विश्वास ठेवलेल्या प्रत्येकाला त्यांनी दिले.