Home स्टोरी कोलकाता उच्च न्यायालयाचा शिवलिंगाला हटवण्याचा आदेश लिहितांना न्यायालयाचे अधिकारी बेशुद्ध पडले !

कोलकाता उच्च न्यायालयाचा शिवलिंगाला हटवण्याचा आदेश लिहितांना न्यायालयाचे अधिकारी बेशुद्ध पडले !

132

घटनाक्रम पाहून न्यायमूर्तींनी शिवलिंग हटवण्याचा आदेश घेतला मागे !

शिवलिंग स्वयंभू असल्याचे प्रकरणातील व्यक्तीचे मत!

११ऑगस्ट वार्ता: कोलकाता उच्च न्यायालयाने राज्यातील मुर्शिदाबाद येथील भूमीशी संबंधित वादाच्या एका प्रकरणावर सुनावणी करतांना तेथील शिवलिंग हटवण्याचा आदेश दिला होता. या वेळी हा निकाल लिहितांना उप निबंधक विश्‍वनाथ राय अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडले. हे पाहून आश्‍चर्यचकित झालेले न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी शिवलिंग हटवण्याचा आदेश मागे घेत हे प्रकरण कनिष्ठ न्यायालयात पाठवण्याचा आदेश दिला.मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा भागात असलेल्या खिदिरपूर या गावात भूमीच्या एका तुकड्यावरून सुदीप पाल आणि गोविंदा मंडल यांचा वाद चालू आहे. अशातच मे २०२३ मध्ये गोविंदाने त्या भूमीवर शिवलिंगाची स्थापना केल्याचा आरोप करत सुदीपने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. यावर गोविंदाने मात्र स्पष्ट केले आहे की, हे शिवलिंग स्वयंभू असून ते अचानक भूमीतून वर आले.