Home स्टोरी कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या २८,३०३

कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या २८,३०३

60

कोरोना बाबत आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे आता सक्रिय रुग्णांची संख्या २८,३०३ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी गुरुवारी ५,३३५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तसेच गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसमुळे १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची देशातील एकूण संख्या ५ लाख ३० हजार ९४३ वर पोहोचली आहे. आज शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी कोरोना बाबत आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण ४ कोटी ४१ लाख ८५ हजार ८५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.