Home स्टोरी कोरोनामुळे पालघर जिल्ह्यात एकाचा मृत्यू

कोरोनामुळे पालघर जिल्ह्यात एकाचा मृत्यू

74

महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात मुंबई आणि नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढते प्रमाण जास्त दिसून येत आहे. पालघर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हेल्थ युनिट या डेडिकेटेड कोविड हेल्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी बोईसर शासकीय टीमा रुग्णालयात परिसरातील वाळवा या गावातील एका 55 वर्षीय महिलेला श्वसनाला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांना पालघर रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथेही त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबई येथे हलविण्याची तयारी सुरू असताना तिचा त्रास वाढू लागला. परिणामी या महिलेचा मृत्यू झाला. सदर महिला ही खूप गंभीर अवस्थेत असल्याने व्हेंटिलेटर लावण्यात आले नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश बोदाडे ह्यानी सांगितले. व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून न दिल्याने तिचे निधन झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्ण वाढत असतानाच व्हेंटिलेटरचा योग्य वापर होत नसल्याने आरोग्य विभाग कोरोना बाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.