सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आपले निबंध येत्या दि. २२ फेब्रुवारी पर्यंत द्यावयाचे आहेत.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंतीनिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी आपले निबंध मळगाव हायस्कूल, मळगाव ता. सावंतवाडी तसेच श्री. अभिमन्यू लोंढे, द्वारा रत्नागिरी टाईम्स, कार्यालय सावंतवाडी येथे दि. २२ फेब्रुवारीपर्यंत आणून द्यावयाचे आहेत.
सदर स्पर्धा विविध गटात होणार असून प्राथमिक गट (इयत्ता पाचवी ते सातवी) असून निबंधाची शब्द मर्यादा ३०० ते ४०० शब्द, विषय – ‘शिवराय माझे आवडते राजा’ ,
माध्यमिक गट (इयत्ता आठवी ते दहावी) आणि निबंध शब्द मर्यादा ५०० ते ७०० शब्द, विषय – ‘शिवाजी महाराज आणि पर्यावरण’. असा आहे.
या स्पर्धेसाठी प्राथमिक व माध्यमिक गटासाठी प्रत्येकी प्रथम क्रमांक रुपये ३०१ व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रुपये २०१ व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रुपये १०१ व सन्मानचिन्ह असे असून ही सर्व बक्षीसे पत्रकार अमोल टेंबकर यांनी आपल्या मातोश्री स्व मंदा मंगेश टेंबकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केली आहेत.
तरी अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन शिवजयंतीनिमित्त आपल्या नैपुण्याचे प्रदर्शन करावे, असे आवाहन कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण यांनी केले आहे.