Home स्टोरी कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

90

सावंतवाडी प्रतिनिधी: भारतरत्न तथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि त्यांची साहित्य आणि त्यांचे विचार आजच्या युवा पिढीला समजावेत यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्या वतीने या वर्षभरात २६ नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक शाळा व संस्थांमध्ये संविधान जागर व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य चळवळ अभियान राबविण्यात येणार आहे. अशी माहिती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांनी दिली कोमसापतर्फे आज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती व त्यांच्या स्मृतीस अभिवादन कार्यक्रम पालिकेच्या पत्रकार कक्षात करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत व अटल प्रतिष्ठान चे अध्यक्ष एडवोकेट नकुल पार्सेकर यांच्या हस्ते घालण्यात आला. व या महामानवाला अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना एडवोकेट सावंत म्हणाले की, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आणि खऱ्या अर्थाने लोकराज्य लोक हक्क प्रस्थापित झाले. पण आज लोकशाही धोक्यात येत आहे की काय अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजच्या युवा पिढीला संविधान समजायला हवे आणि त्यासाठी संविधान जागर अभियान व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि साहित्य समजावे यासाठी नव्या शैक्षणिक वर्षापासून सावंतवाडी तालुक्यातील इयत्ता अकरावी बारावी या विद्यार्थ्यांना संविधान जागर व साहित्य चळवळ अभियान उपक्रम राबविण्यात येणार आहे सावंतवाडी तालुक्यातील जवळपास १५ माध्यमिक शाळा मध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि या उपक्रमाद्वारे आजच्या तरुणांना आणि आजच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख व्हावी या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच काही सहकार तसेच शिक्षण आधी संस्थांमध्येही संविधान जागर केला जाणार आहे या जागर माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वर्षभर साजरी करून खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी एडवोकेट नकुल पार्सेकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या पद्धतीने लोकशाही रुजवली मात्र ती लोकशाही आज धोक्यात आली आहे. जात-पात धर्मभेद अजूनही आहे राजकीय मंडळी मतांच्या झोकाव्यासाठी लोकशाही धोक्यात आणत आहेत. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आचार आत्मसात करायचे असतील तर त्यांचा जागर करायला हवा.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष भरत गावडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान प्रत्येक शाळे मध्ये त्यांचे वाचन व्हायला हवे आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तरुणांसमोर उभे केले पाहिजे. असे सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावंतवाडीतील भेट ची आठवण करून दिली. यावेळी सचिव प्रतिभा चव्हाण व दीपक पटेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता सादर केली. यावेळी सूत्रसंचालन व आभार विनायक गावस यांनी केले.

फोटो: सावंतवाडी कोम साप सावंतवाडी शाखेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करताना व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत बाजूला एडवोकेट नकुल पार्सेकर प्रतिभा चव्हाण विनायक गावस अभिमन्यू लोंढे दीपक पटेकर भरत गावडे आदी