Home स्टोरी कोमसाप च्या वतीने प्राध्यापक मिलिंद भोसले आणि एडवोकेट दीपक नेवगी स्मृतिदिन अभिवादन...

कोमसाप च्या वतीने प्राध्यापक मिलिंद भोसले आणि एडवोकेट दीपक नेवगी स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

65

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे व राणी पार्वती देवी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक मिलिंद भोसले यांचा पाचवा स्मृतिदिन व प्रसिद्ध कायदे तज्ञ एडवोकेट दीपक नेवगी यांचा प्रथम स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रम उद्या बुधवारी १५ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता राणी पार्वती देवी हायस्कूल च्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत व युवा सदस्य विनायक गावस यांनी केले आहे