सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भोसले तळीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या ५ व्या स्मृतिदिनी अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तर कायदेतज्ञ अँड. दीपक नेवगी यांचा प्रथम स्मृतिदिनी आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कोमसापाचे तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी या दोन्ही व्यक्तींच्या स्मरणार्थ साहित्य चळवळीतुन मान सन्मान केला जाईल आणि या माध्यमातून त्यांचे स्मरण साहित्य क्षेत्रात सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कायम ठेवले जाईल सांगितले व कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली वाहिली. शाळा सुटल्यानंतर देखील शाळेच्या मैदानात ज्याचे पाय घुटमळतात, त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचा गराडा असतो, असा शिक्षक भोसले सरांच्या रूपानं मी पाहिला. विद्यार्थी घडविणारे हे शिल्पकार शरीरानं नसले तरी त्यांच्या विचारांच्या रुपानं आजही आपल्यासोबत आहेत. असं शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव माजी प्राचार्य व्ही.बी. नाईक यांनी केलं. स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या ५ व्या व कायदेतज्ञ अँड. दीपक नेवगी यांचा प्रथम स्मृतिदिनी आदरांजली अर्पण करण्यात आली. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रास्ताविकात कोमसाप अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी स्व. मिलिंद भोसले व अँड. नेवगी यांच्या स्मृती जागवत आदरांजली अर्पण केली. ते म्हणाले, कोमसाप सावंतवाडी शाखेला सुरुवातीच्या काळात बळ देण्यात या दोन्ही व्यक्तींचा मोठा वाटा होता. या दोन्ही महनीय व्यक्तींच्या नावानं साहित्य क्षेत्रात मानसन्मान देण्याचा आमचा मानस आहे. यावेळी उपस्थित अँड. निता कविटकर, कवी विठ्ठल कदम, प्रा. चंद्रशेखर धुरी, प्रा. रूपेश पाटील, प्रा. संजय कात्रे, अँड. नकुल पार्सेकर, प्रा. गिरीधर परांजपे, अभिमन्यू लोंढे आदींनी मनोगत व्यक्त करत, आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली. यावेळी प्रा. संजय कात्रे म्हणाले, देव आणि धर्म यामध्ये देश लागतो. या देशात समाज महत्वाचा असतो. या समाजाचे आपण देणं लागतो हा विचार भोसले सरांनी जोपासला. तर अँड. निता सावंत- कविटकर म्हणाल्या, भोसले सरांनी जसे विद्यार्थी घडविले त्याचप्रमाणे अँड. दिपक नेवगी यांनी विधी क्षेत्रात विद्यार्थी घडविण्याचे कार्य केलं. नेहमीच त्यांच कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला आम्हाला मिळत आला. त्यांच्या निधनाने आमचा विधी क्षेत्रातील मार्गदर्शक हरपला अशा भावना व्यक्त केल्या. सावंतवाडीप्रमाणे माणगांव गावात स्व.मिलिंद भोसले यांनी केलेल्या शैक्षणिक कामाची जाणीव आज होत आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. तर अँड. नेवगी यांच कार्य देखील मोठ होत. ट्रस्ट बाबतचा दांडगा अभ्यास असणारे असे ते एकमेव वकील होते असं मत अँड. नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केले. प्रा. गिरीधर परांजपे म्हणाले, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रात मिलिंद भोसले यांनी केलल कार्य बहुमोल आहे. भोसले तळीकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी समाजात कार्य करणाऱ्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींपासून वृत्तपत्र विक्रेता, भाजी विक्रेता यासह समाजासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाचा गौरव केला. मराठी भाषेबद्दल त्यांना सार्थ अभिमान होता. भाषेच्या संवर्धनासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ते कार्यरत होते. मराठी भाषा दिवस हा त्यांच्या जीवनातील शेवटचा कार्यक्रम ठरला. मुलांनी व्यक्त व्हावं यासाठी त्यांची धडपड असायची. आज त्याचमुळे त्यांचे असंख्य विद्यार्थी सामाजात मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत.याप्रसंगी शि.प्र. मंडळ सावंतवाडीचे सचिव माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांनी आदरांजली अर्पण करत आपल्या भावांनाना वाट मोकळी करून दिली. आम्हाला त्यांची गरज असताना भोसले सर निघून गेले. आरपीडीच्या याच वास्तूत त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं. मराठी भाषेवर प्रभुत्व व वाचनाची आवड असल्यानं त्यांनी मराठीचे फक्त धडे न देता विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवली. भाषा अनुभवत मायबोलीची गोडी निर्माण केली. मी शाळेचा प्राचार्य असताना मराठीचे प्रा. मिलिंद भोसले व इंग्रजीचे प्रा. प्रवीण बांदेकर ही जोडी होती. विद्यार्थांना भाषेचं ज्ञान देण्यासह त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठीची योजना त्यांनी आखली. मुलांना त्यांच्या पायावर उभं केलं. विद्यार्थांची पारख त्यांना होती. सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांना पुढे आणत सहशालेय उपक्रमात त्यांनी मुलांना सहभागी करून घेतले. यातूनच गुरू-शिष्याच नातं भोसले सर आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले. शाळा सुटल्यानंतर देखील शाळेच्या मैदानात ज्याचे पाय घुटमळतात, त्यांच्या भोवती विद्यार्थ्यांचा गराडा असतो असा शिक्षक त्यांच्या रूपानं मी पाहिला. असा विद्यार्थी प्रिय शिक्षक हरपला याच दुःख आहे. परंतु, ते विचारांच्या रुपानं आजही आपल्यासोबतच आहेत. अशा भावना व्ही.बी.नाईक यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमसाप सदस्य विनायक गांवस तर आभार उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव व्ही. बी. नाईक, कोमसाप शाखा सावंतवाडीचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत, प्रा. गिरीधर परांजपे, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, कवी विठ्ठल कदम, प्रा. संजय कात्रे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, अँड. नकुल पार्सेकर, डॉ. दिपक तुपकर, दिपक पटेकर, अँड. निता कविटकर, मानसी भोसले, हेमंत खानोलकर, प्रतिभा चव्हाण, प्रा. रूपेश पाटील, प्रा. चंद्रशेखर धुरी, हर्षा खानोलकर, अन्वीता सावंत, निलेश मेस्त्री, पल्लवी ढोरे, मकरंद मेस्त्री आदी उपस्थित होते.