Home स्टोरी कोमसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्षपदी आमदार दिपक केसरकर यांची निवड.

कोमसापच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्षपदी आमदार दिपक केसरकर यांची निवड.

45

सावंतवाडी प्रतिनिधी: संस्थानकलीन सावंतवाडी नगरीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन होत आहे. या पर्यटन नगरीत हे साहित्य संमेलन एक वेगळीच साहित्य मेजवानी ठरणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे येणार असल्याने हे साहित्य संमेलन एक दर्जेदार संमेलन ठरणार आहे. असे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आमदार दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. या संमेलनाचे अध्यक्ष वस्त्रहरण नाटकाचे लेखक वस्त्रालंकार गंगाराम गवाणकर हे लाभले आहेत. २२ मार्च रोजी एकदिवसीय हे साहित्य संमेलन होणार असल्याने या संमेलनात साहित्य चळवळ व मराठी भाषा संवर्धन व जतनच्या दृष्टीने व्यापक चर्चा होणार आहे. पर्यटन जिल्ह्यामध्ये साहित्य सांस्कृतिक चळवळ अधिक व्यापकतेने वाढीच्या दृष्टीने सांस्कृतिक साहित्यिक मंडळे प्रयत्न करत आहेत. या संमेलनाचा साहित्य प्रेमी लेखक मराठी भाषा प्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन स्वागत अध्यक्ष श्री केसरकर यांनी केले आहे. स्वागत अध्यक्ष श्री केसरकर यांनी या साहित्य संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन आर्थिक मदतही केली आहे. श्री केसरकर यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, तालुकाध्यक्ष ॲड संतोष सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.

यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, दिपक पटेकर, प्राध्यापक सुभाष गोवेकर, विनायक गावस आदी उपस्थित होते. यावेळी श्री केसरकर यांनी सावंतवाडीच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन दर्जेदार व्हायला हवे. त्या दृष्टीने योग्य नियोजन करा विविध समित्या गठीत करा या संमेलमध्ये सर्वांना सामावून घ्या असे स्पष्ट केले व कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. सावंतवाडी तालुका शाखेचे बैठक घेण्यात आली. ही बैठक अध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत साहित्य संमेलन संदर्भात नियोजन संदर्भात चर्चा झाली. साहित्य संमेलन हे सावंतवाडी नगरीमध्ये कित्येक वर्षानंतर प्रथमच होत आहे. या नगरीला पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी असे या साहित्य संमेलनाला नाव देण्याचे ठरले. तसेच या साहित्य संमेलनासाठी जिल्हास्तरावरून विविध समित्या घटित करण्यात आले आहेत. त्या समित्यामध्ये. मुख्य संयोजन समिती प्रसिद्धी समिती ,सांस्कृतिक समिती ग्रंथदिंडी समिती निधी संकलन समिती, व्यासपीठ व्यवस्था समिती, स्वागत समिती, भोजन व्यवस्था समिती, प्रकाशन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती, वाहतूक व्यवस्था समिती, आधी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा चे कार्यकारणी सदस्य तसेच अन्य आजीव सदस्य त्याचबरोबर सावंतवाडी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच जिल्हास्तरावरील कोकण मराठी साहित्य परिषदेचे सक्रिय तालुका अध्यक्ष, सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आले आहेत. गेल्या कित्येक दशकानंतर सावंतवाडी संस्थानकालीन शहरात असे साहित्य संमेलन प्रथमच होत आहे. या संमेलनात पद्मश्री मधु मंगश कर्णिक, नाटक वस्त्रहरण चे लेखक प्रा गंगाराम ग वानकर यांचे विशेष आकर्षण आहे.  त्यामुळे हे संमेलन. सावंतवाडीच्या सांस्कृतिक नगरीमध्ये संस्थानकालीन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज सांस्कृतिक नगरी या नावाने हे संमेलन होत आहे. तरी या संमेलनासाठी सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व साहित्यिक तसेच विविध संस्था वकील डॉक्टर लेखक आधी साहित्यिकांनी सहभागी व्हावे. तसेच या संमेलनाच्या समित्यांमध्ये सर्व घटकातील तसेच विविध डॉक्टर वकील, साहित्यिक, महिला रोटरी इनरव्हील आदि संस्था यांना समाविष्ट करण्यात आले आहे. बैठकी तालुकाध्यक्ष एडवोकेट संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

यावेळी सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, एडवोकेट नकुल पार्सेकर, प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, दिपक पटेकर, विनायक गावस, रुपेश पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत सावंतवाडी त होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी समित्या गठीत करणे असे ठरवण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात बैठक झाली.