Home स्टोरी कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार.

कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार.

144

८ एप्रिल वार्ता: कोकण रेल्वे मार्गावर सुट्यांचा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ वेळा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ एप्रिल २०२४ पासून या विशेष गाड्या चालू होतील.

 

१. ) ०१४६३ साप्ताहिक विशेष’ गाडी ११.४.२०२४ ते २७.०६.२०२४ पर्यंत प्रतिगुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई दुपारी ४.०० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री ९.४५ वाजता कोचुवेली येथे पोचेल.

 

२.) ०१४६४ साप्ताहिक विशेष कोचुवेली’ गाडी १३.४.२०२४ ते २९.६.२०२४ पर्यंत प्रती शनिवारी दुपारी ४.२० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ११.५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोचेल.

 

३.) या ‘समर स्पेशल’ गाडीचे थांबे पुढीलप्रमाणे आहेत. – ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर, एरणाकुलम जं, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायमकुलम आणि कोल्लम जं.