Home स्टोरी कोकणची कला जोपासणारा दत्ताराम सावंत!

कोकणची कला जोपासणारा दत्ताराम सावंत!

791

सिंधुदुर्ग: उत्तम शेती, दुय्यम धंदा व कनिष्ठ नोकरी हा क्रम आता उत्तम नोकरी, दुय्यम धंदा व कनिष्ठ शेती असा झाला आहे. नोकरीसाठी बहुतांश लोक शहरांकडे येत आहेत; पण वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना; तसेच शिक्षित तरुणांना शहरात स्थायिक होणे, स्वतःचे घर घेणे जिकिरीचे होत आहे. वडिलोपार्जित शेतीवाडीत म्हणावा तितका जमिनीचा हिस्सा मिळत नसल्यामुळे, गावाकडे नवीन प्रकल्प साकारणे व स्थायिक होणे, ही तारेवरची कसरत ठरत आहे. मग दुय्यम धंदा हा पर्याय शिल्लक राहतो आणि म्हणूनच आज पदवीधारकांनी रोजगार निर्मिती; तसेच व्यवसायाकडे वळले पाहिजे. हाच उद्देश घेऊन आसोली गावातील दत्ताराम सावंत हा तरुण मुंबईत पखवाज वादनाचे शिक्षण घेऊन सध्या तळवडे गावात आपला व्यवसाय सुरू करून उदरनिर्वाह करत आहे. आज दत्ताराम सावंत यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून ओळख आहे. तसेच आसोली गावातील दत्ताराम सावंत हे म्युझिकचे क्लासही घेतात. आज दत्तासावं त यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी पखवाज, तबला आणि मृदुंग वाजवायला शिकत आहेत. आज अनेक तरुण तरुणी उच्च ण घेतल्यानंतर गावाकडून मोठ्या शहराकडे धाव घेतात आणि तिथे आपलं नशीब आजमावतात. आज पदवीधरांना सरकारी नोकरीचे आकर्षण वाटत असले, तरी राज्ये; तसेच केंद्र सरकारच्या अनास्थेमुळे सरकारी नोकरभरती मंद आहे. व्यवसाय करणे खूप कठीण आहे. त्यात अडचणी आहेत. खूप भांडवलाचीही गरज लागते. व्यवसाय म्हणजे अळवावरचे पाणी, असा समज आहे. या साऱ्या कारणांमुळे पदवीधर उद्योगधंद्याविषयी तरुण तरुणी उत्सुक नसतात. आणि यामुळेच आज अनेक तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. या तरुणांसाठी आसोली गावातील दत्ता सावंत हा एक अपवाद आहे. फार मोठी गुंतवणूक न करता शिकलेल्या कलेच्या आधारावर दत्ता  सावंत यांनी आपला तुळजाभवानी म्युझिकल्स नावाने स्वतः व्यवसाय सुरू केला. डगा तबला , मृदुंग, नाळ आणि यासंबंधित इतर साहित्य दुरुस्त करून देणे आणि यासोबतच अनेक विद्यार्थ्यांना पखवाज वादन शिकवणं असं  उत्कृष्ट कार्य दत्ताराम सावंत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात करत आहेत. दत्ता सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमध्ये पखवाज आणि तबला वादन करतात. दत्ता सावंत हे आजचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीचे सुप्रसिद्ध पखवाज वादक आहेत.  गुरुवर्य श्री आनंद मोर्यें सर आणि गुरुवर्य श्री. मंगेश जी पाटोळे सर हे दत्ताराम सावंत यांचे गुरु आहेत.

 

अशा दत्ता सावंत सारख्या गावच्या मातीत वावरणारा, कोकणची कला जोपासणारा, कोकणची कला अनेक विद्यार्थ्यांना शिकवणारा, भजनी कलाकार घडवणारा आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गाव सोडून नोकरीसाठी शहरात राहून कसातरी उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या दत्ता सावंत ची ही मुलाखत नक्की बघा.