Home स्टोरी कै. श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव जिल्हा परिषद शाळा नंबर ६ भटवाडी, शाळेच्या...

कै. श्रीमती लक्ष्मीबाई मुरारी माधव जिल्हा परिषद शाळा नंबर ६ भटवाडी, शाळेच्या दुरुस्तीसाठी पंधरा लाख रुपये मंजूर.

94

भटवाडी येथील जिल्हा परिषद शाळा नंबर ६ या शाळेच्या दुरुस्तीसाठी माजी नगरसेविका दिपाली भालेकर व उच्च शिक्षक तज्ञ दिलीप भालेकर तसेच ग्रामस्थ यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर व पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळा ६ नंबर भटवाडी शाळा दुरुस्ती कामे पंधरा लाख रुपये निधी प्राप्त झाला. तसेच सदर शाळेसाठी दोन कॉम्प्युटर टीव्ही मिळवून देण्यासाठी माझी नगरसेवक संजय पेडणेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या जवळ पाठपुरावा केला होता. असे मत मुख्याध्यापिका लांबर मॅडम यांनी व्यक्त केले. तसेच शाळा उभारणीसाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांनी माजी नगरसेवक संजय पेडणेकर यांच्याशी बोलताना व्यक्त केले.याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष श्रीमती अनिशा राणे, माजी नगरसेविका दिलीप भालेकर, उच्च शिक्षक तज्ञ दिलीप भालेकर, माजी नगरसेवक संजय पेडणेकर, शामराव हळदणकर, प्रसाद राणे, रवी नाईक, विशू कोळंबेकर, शेखर सुभेदार, तसेच जिल्हा परिषदचे इंजिनियर सुहास टेमकर आणि सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.शाळा रिपेरिंग चे पूर्ण काम एप्रिलच्या एंडिंग पर्यंत पूर्ण होईल. असे जिल्हा परिषदचे इंजिनियर सुवास टेमकर यांनी सांगितले. त्यावेळी शाळा व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापिका सौ. सायली लांबर, उपमुख्याध्यापिका सौ गीता मिस्त्री, केंद्रप्रमुख लंग्वे मॅडम यांनी उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले व अशाच प्रकारचे सहकार्य ग्रामस्थांकडून मिळत रहावो अशी आशा व्यक्त केली.