Home शिक्षण कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन.

91

सावंतवाडी प्रतिनिधी: डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडी यांच्यावतीने कै.दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दि.१६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा विविध गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे विषय

गट अ नर्सरी ते सिनीअर केजी – रंगभरण स्पर्धा

गट ब इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी – रंगभरण स्पर्धा

गट क इयत्ता ५ वी ते ७ वी – जत्रा

गट ड इयत्ता ८ वी ते १० वी – प्लास्टिक मुक्त पृथ्वी

गट इ खुला गट – दशावतार

 

स्थळ: बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट) फॉरेस्ट ऑफिस जवळ, सालईवाडा सावंतवाडी

नियम:- विद्यार्थ्यांनी येताना चित्रकलेसाठी लागणारे साहित्य घेऊन यायचे आहे.उदा. रंग, ब्रश, ड्रॉइंग पॅड इत्यादी

• स्पर्धेसाठी लागणारा पेपर विद्यार्थ्यांना पुरवण्यात येईल.

• प्रवेश शुल्क ५०/- रुपये

• १४ नोव्हेंबर २०२५ पर्यंतच नाव नोंदणी करायची आहे.

विजेत्यांना रोख रक्कम आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तरी या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. गोविंद उर्फ केदार बांदेकर व सचिव सौ. अनुराधा बांदेकर-परब यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी: श्री तुकाराम मोरजकर ९४०५८३०२८८ व श्री सिद्धेश नेरुरकर ९४२०२६०९०३ यांच्याशी संपर्क साधावा.