अनिल उर्फ आबा परुळेकर यांचे माठेवाडा येथे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. केशवसुत कट्ट्याचे सदस्य म्हणून ते सर्वांना सुपरिचित होते. शिक्षणाप्रती आस्था व लोकांना कायम सढळ हाताने मदत करण्याची वृत्ती असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्याची त्यांच्या कार्याची आठवण म्हणून उद्या रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता केशवसुत कट्टा येथे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी त्यांच्या ज्येष्ठ मित्र मंडळींनी व चहात्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली द्यावी. रवी जाधव, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग