Home क्राईम केंद्रीय मंत्री नितीन गडकरीना धमकीचे फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरीना धमकीचे फोन करणारा पोलिसांच्या ताब्यात!

81

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याचा ताबा नागपूर पोलिसांना मिळाला आहे. जयेश पुजारीला बेळगावमध्ये अटक झाली होती. त्यानंतर त्याचा ताबा घेण्यासाठी नागपूर पोलिसांची एक टीम बेळगावला गेली होती. ही टीम आता आरोपी जयेश पुजारीला घेऊन नागपूरला परतली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे तीन फोन आल्यामुळं एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने दोनदा धमकीचे कॉल आले होते. जयेश पुजारी बेळगावच्या जेलमध्येच होता. त्यानंतर पुन्हा जयेश पुजारीच्या नावाने दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गडकरी यांच्या कार्यालयात २१ मार्चला लागोपाठ तीन कॉल आले. १०:५५ वाजता आलेल्या पहिल्या कॉलमध्ये बोलणे झाले नाही. मात्र ११ आणि ११:५५ वाजता आलेल्या पुढील दोन कॉलमध्ये धमकी देणाऱ्याने जयेश पुजारी बोलत असल्याचे म्हटले आणि दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसेच याची वाच्यता पोलिसांकडे करू नये असा इशाराही दिला. सोबतच त्याने संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांकही दिला. तो मोबाईल क्रमांक मंगळूरमधील एका मुलीचा आहे. ती तिथे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करते. काही दिवसांपूर्वी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला उडवून टाकू अशाच धमकीचा कॉल संघ कार्यालयात आला होता संघ मुख्यालय उडवून टाकण्याची धमकी देणारा तो कॉल इंटरनेट कॉल होता. आतापर्यंतच्या पोलीस तपासामध्ये आरएसएस कार्यालयात आलेल्या धमकीच्या कॉलचा लोकेशन वारंवार बदलत असल्याचे दिसून आले आहे. हे लोकेशन कधी सिंगापूर, कधी इंडोनेशिया, कधी मलेशिया अशा विविध ठिकाणचे आढळून येत आहे.जेलमधूनच अशाच पद्धतीने अनेक वेळा पूर्वी ही मोठे अधिकारी आणि इतरांना धमकीचे कॉल केल्याची माहिती आहे. गडकरी यांच्या कार्यालयात देण्यात आलेल्या धमकीमागे एकटा जयेश आणि त्याची टोळी आहे की अंडरवर्ल्डचे काही मोठे गॅंगस्टर यामागे आहेत, याचा तपास सध्या पोलीस करत आहे. दरम्यान नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.