Home स्टोरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन!

81

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते नाशिकच्या ईदगाह मैदानावर आयोजित ‘नो युअर आर्मी’ या भारतीय संरक्षण दलाची ताकद दाखवणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गडकरींसमवेत मंचावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी त्यांनी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रांची पाहणी केली. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, एक काळ असा होता की, आपण शस्त्र आयातकरायचो. पण मोदीजींच्या नेतृत्वात मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया उपक्रम सुरु झाले आहेत. एक काळ असा होता की, आपण सगळं काही आयात करत होतो. आता आपण संरक्षण साहित्य निर्यात करतो. आपले शुर सैनिक जे कार्य करतात, ते जे सामग्री वापरतात, याची माहिती जनतेला व्हावी. म्हणून याचे आयोजन आले आहे. अतिशय हुशार विद्यार्थी सैन्य दलाकडे वळत आहेत. आज डिफेन्समध्ये जे संशोधन सुरु आहे, त्यामुळे नवीन रोजगार निर्मिती होईल. नागपूरला जे राफेल एयरक्राफ्ट आहे, तिथे मुलांना रोजगार मिळत आहे. नागपूरला फाल्कन जेट देखील तयार होणार आहे. नाशिकमध्ये देखील डिफेन्सबाबत उत्पादनासाठीसाठी वाव आहे. येणाऱ्या काळात आपण आपल्या सीमांचे रक्षण तर करुच, पण सामर्थ्य झाल्याने कुठलेही राष्ट्र वाकडी नजर ठेऊन आपल्याकडे बघू शकणार नाही. यात तिन्ही सेनांचे योगदान असंल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.