मसुरे प्रतिनिधी: कोकणचे भाग्यविधाते केंद्रिय मंत्री श्री नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक शाळा ते रवळनाथ मंदिर रस्ता व वडाचापाट मोडका आंबा रस्त्यांचे उद्घाटन वडाचापाटचे ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते श्री दादाजी पालव यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच प्राथमिक शाळा वडाचापाट, थळकरवाडी, पारकरवाडी, नवपाटवाड़ी अंगणवाडी मध्ये मुलांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, माजी सभापती श्री राजेंद्र प्रभुदेसाई,उपसरपंच श्री सचिन पाताडे, ग्रा.सदस्य
श्री विनायक प्रभुदेसाई, विराज पाटकर, दर्शना कासले, सविता पालव, वेदिका माळकर, शामल मांजरेकर, माजी सरपंच श्री रविंद्र प्रभुदेसाई, महेंद्र हडकर, भाजप कायकर्ते प्रथमेश पालव, श्रीकांत पाटकर, तात्या कासले आदी उपस्थित होते.