सावंतवाडी: उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४ अंतर्गत शेतकऱ्यांच्या मार्गदर्शना साठी आलेल्या कृषीदुतांकडून “आंब्याचे कोय कलम व बीज प्रक्रिया” प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले. या प्रात्यक्षिकाद्वारे ‘डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली’ ने निर्माण केलेले “कोय कलम” कसे बांधावे याची माहिती दिली, या सोबतच सावंतवाडी कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे सर व इन्सुली कृषी सहायक सीमा घाडी मॅडम यांनी शेती शाळा आयोजित करून “एस.आर.आय. सूत्री भात लावणी पद्धत व बीज प्रक्रिया” याची माहिती गावातील महिला बचत गटाला दिली.
सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी कोय कलम कसे बांधावे त्याचे महत्व व फायदे त्यासोबतच त्याला येणारा खर्च व अणि मिळणारा नफा या बद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. ह्या कार्यक्रमास महिला शेतकर्यांनी चांगला सहभाग नोंदवला . तसेच तालुका कृषी पर्यवेक्षक यशवंत गव्हाणे सर व कृषी सहायक सीमा घाडी मॅडम यांनी “एस.आर.आय. सूत्री भात लावणी पद्धत व बीज प्रक्रिया” याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर गटा मध्ये प्रियश राघोबा धुरी, मल्हार संदिप महाजन, हर्षल अरुण पाटील, श्रेयस जयंत गायकवाड, ओवेश गुलाम मिर्झा नाडकर, नंदन आर, सौरजो किरण चौधरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.