Home स्टोरी कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यकामांचे आयोजन…!

कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यकामांचे आयोजन…!

41

सावंतवाडी: कुणकेरी-लिंगाचीवाडी येथील दत्त मंदिरात दि. १९ डिसेंबरपासून २६ साव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंती दिवशी या पारायणाची सांगता होणार आहे. काल मंगळवार १९ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता रामचंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या पारायणास प्रारंभ झाला. यानिमित्त दत्त मंदिरात दररोज पहाटे ४ काकड आरती, सकाळी ७ वाजता श्री दत्त महाराज पूजन सोहळा आणि हरिपाठ, सकाळी ८ वाजल्यापासून श्री ज्ञानेश्वरी वाचनाला सुरुवात झाली. आज बुधवार दि.२० डिसेंबर रोजी डिसेंबरला निळेली वारकरी संप्रदाय आणि आसोली गावडेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन होणार आहे. गुरुवार २१ डिसेंबरला शिरशिंगे वारकरी संप्रदायाचा हरिपाठ होणार आहे. शुक्रवार २२ रोजी सांगेली काडसिद्धेश्वर भजन मंडळ आणि मातोंड श्री इसोटी प्रसादिक भजन भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे.

शनिवार २३ डिसेंबरला कुणकेरी निळेली वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम तर रविवार २४ डिसेंबरला नारुर श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम आहे. रविवार २४ डिसेंबरला नारुर श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, २५ डिसेंबरला जगदंब संगीत विद्यालय आणि आंबेगाव विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, २६ डिसेंबरला साळेल अष्टविनायक प्रासादिक भजन मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी दत्त जयंतीनिमित्त काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी १२ वाजता दत्त जन्मोत्सव दिंडी प्रदक्षिणा सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.