Home राजकारण कुडाळ विधानसभा मतदार संघातुन शिवसेनेचे संजय आंग्रे रिंगणात राहणार…! रूपेश पावसकर

कुडाळ विधानसभा मतदार संघातुन शिवसेनेचे संजय आंग्रे रिंगणात राहणार…! रूपेश पावसकर

211

कुडाळ: कुडाळ विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा आहे.त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेच्या तिकीटावर धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणुक लढवावी अशी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे कुडाळ मधुन संजय आंग्रे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हा संघटक रूपेश पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पावसकर बोलत होते. यावेळी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

    श्री. पावसकर म्हणाले की, येणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यात शिवसेनेची संघटना मजबुत कशी होईल त्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढविल्या जाव्यात अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी आहे. कुडाळ विधानसभा मतदार संघातुन तर जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या नावाला अधिक पसंती आहे. याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संघटनेच्या बैठकीत श्री. आंग्रे यांच्या नावाला पसंती दर्शविली आहे. परिणामी कुडाळ विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच आमदार असणार ही काळ्या दगडावरची रेख असल्याचे श्री. पावसकर यांनी सांगितले.