Home स्टोरी कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिर  संपन्न.

कुडाळ येथे संयुक्त योगोपचार शिबिर  संपन्न.

69

कुडाळ प्रतिनिधी: पतंजलि योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कुडाळ शहरामध्ये  संयुक्त योगोपचार शिबिर गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ ते २७ जानेवारी २०२५  दरम्यान होत आहे. सकाळी ६:००  ते ७:३०  या वेळेत दररोज ५ दिवशीय शिबिर संपन्न होणार आहे .

सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासन, ऍडव्हान्स योग, आयुर्वेद तसेच योगोपचार आणि आध्यात्मिक उन्नती बाबत विशेष वर्ग होतील. या शिबिरात मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा, सांधेदुखी, हृदयविकार या व्याधींच्या निवारणासाठी विशेष मार्गदर्शन दिले जाईल. वासुदेवानंद हॉल, कुडाळ येथे सदर शिबिर होणार आहे.

तरी सर्व योगाभ्यास प्रेमी पुरुष, महिला तसेच लहान मुलांनी या योगशिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. सदर योग शिबीर निःशुल्क आहे त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी श्री. शेखर बांदेकर 9823881712, श्री. लक्ष्मण पावसकर, श्री. काका कुडाळकर, सौ स्नेहांकिता माने यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.