Home राजकारण कुडाळ भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीच्या कारभाराबाबत आक्रमक

कुडाळ भाजपचे नगरसेवक महाविकास आघाडीच्या कारभाराबाबत आक्रमक

72

कुडाळ प्रतिनिधी: – भाजपच्या नगरसेवकांनी कुडाळ नगरपंचायतीच्या पायऱ्यांवर बसून देऊन महाविकास आघाडीच्या कारभाराबाबत आवाज उठवला. कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज (मंगळवारी) कुडाळ नगरपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती या सभेपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल या निदर्शनातून करण्यात आली. यामध्ये बालोद्यानांमध्ये झालेला अपहार तसेच भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी मधील घोटाळा, बहिर्वक्र आरशांमधील घोटाळा याची पोलखोल करून महाविकास आघाडीच्या या कारभाराचा निषेध भाजपच्या नगरसेवकांनी घोषणा देऊन केला. यावेळी भाजपचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, अभिषेक गावडे, निलेश परब, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर उपस्थित होते.