Home स्टोरी कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस

कुडाळमध्ये आ. वैभव नाईक यांनी चालविली एसटी शयनयान बस

460

नव्याने दाखल झालेल्या शयनयान बसचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन! 

सिंधुदुर्ग: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी महामंडळाची विनावातानुकूलित शयनयान (स्लीपर) बससेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु केली आहे. त्याअंतर्गत एकूण ६ बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, बोरविली, कोल्हापूर, लातूर या मार्गावर या एसटी बस धावणार आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटी शयनयान बसचे शनिवारी आमदार वैभव नाईक यांनी उदघाटन करत स्वतः आ. वैभव नाईक यांनी बसचे स्वारथ्य केले. कुडाळ एसटी डेपोत बसची फेरी मारून त्यांनी बसमधील सोयीसुविधा आजमावून बघितल्या.

यावेळी एसटीचे विभागनियंत्रक अभिजित पाटील, कुडाळ एसटी डेपोचे अधिकारी,कर्मचारी, शिवसेना कुडाळ उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,शहरप्रमुख संतोष शिरसाट, शिवसेना एसटी कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप नाईक, माजी नगरसेवक सचिन काळप,राजू गवंडे, संदीप म्हाडेश्वर, गुरु गडकर,अमित राणे, राजू पावसकर,हर्षद काळप, पप्पू धुरी, शैलेश काळप, सिद्धेश काळप, दादा काळप, सत्यवान कांबळी, संदीप काळप, सोनू खोत, महेश पावसकर, भाऊ पाटणकर आदी उपस्थित होते.