Home राजकारण कालपासून त्यांना घाम फुटलाय, त्यामुळे…. संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला;

कालपासून त्यांना घाम फुटलाय, त्यामुळे…. संजय राऊतांचा भाजपाला खोचक टोला;

71

राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची असलेली कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी संध्याकाळी हाती आला. त्यानुसार, कसब्यामध्ये भाजपाला पराभवाचा धक्का देत मविआकडून राष्ट्रवादीच्या रवींद्र धंगेकरांनी विजय मिळवला असून चिंचवडची जागा अश्विनी जगताप यांच्या विजयामुळे राखण्यात भाजपाला यश आलं आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाला टोला लगावला आहे.नेमकं काय म्हणाले संजय राऊत?….कालपासून त्यांना घाम फुटलाय. त्यामुळे इतर निवडणुका पुढे ढकलल्या जातील. त्यांची थोडीफार शिल्लक झोपही उडाली आहे. कसब्यात त्यांचा पराभव झालाच आहे. पण चिंचवडमध्ये त्यांचा विजय झालाय हे मी मानायला तयार नाही. आमच्यातलाच एक बंडखोर उभा करून मतविभागणी करण्यात त्यांना यश प्राप्त झालं. नाहीतर चिंचवडही कसब्याच्याच मार्गाने गेला असता. असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी कसब्यातील जागा २०२४ मध्ये जिंकण्याचा निर्धार गुरुवारी बोलून दाखवला असताना त्यावरून राऊतांनी टोला लगावला आहे. राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पुढच्या मार्गाने निवडून येणार आहेत की मागच्या? असा खोचक सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. कसब्यात फडणवीस पुढच्या मार्गाने जिंकणार आहेत की मागच्या दाराने? हे त्यांनी स्पष्ट करावं. कसब्यात त्यांनी येण्याचे प्रयत्न केले, पण ते येऊ शकले नाहीत. चिंचवडचा दरवाजा फक्त जगतापांमुळे उघडला गेला. ती त्यांची जागा आहे. असं राऊत यावेळी म्हणाले.