Home स्टोरी कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी...

कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

72

सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यानिमित्त सकाळी ९ वाजता अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, सकाळी १० वाजता श्री पुरुषोत्तम याग, दुपारी २ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ४ श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. डॉ. नामदेव गवळी आणि मयूर गवळी यांनी केले आहे.