Home स्टोरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

35

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंदाची माहिती दिली आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रात अमरावतीत मेगा टेक्स्टाईल पार्कला मान्यता दिली. मागच्या काळात हा प्रस्ताव आम्ही पाठवला होता. आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली होती. आता टेक्स्टाईल पार्क मंजूर झालाय. मागच्या काळात आपण अमरावतीत टेक्स्टाईल पार्कची इको सिस्टिम आधीच तयार केली आहे. एक मोठा टेक्सटाईल झोन तयार केला आहे. अनेक कंपन्या तिथे आल्या आहेत. आता हा टेक्सस्टाईल पार्क आल्याने दहा हजार कोटींची गुंतवणूक, एक लाख लोकांना थेट आणि दोन लाख लोकांना अप्रत्यक्षपणे असा तीन लाख लोकांना रोजगार मिळेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समृद्धी येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे. त्यामुळे हा पार्क आल्यानंतर आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायादा मिळेल. खरं म्हणजे या पार्कमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था बदलण्याकरता देखील मोठी महत्त्वाची मदत होणार आहे. म्हणून मी पंतप्रधान मोदी यांचे मनापासून राज्य शासनाचे आभार व्यक्त करतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.