Home स्टोरी कांद्याचे भाव सध्या गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच अडचणीत!

कांद्याचे भाव सध्या गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच अडचणीत!

72

कांदा उत्पादक शेतकरी सध्या खूपच अडचणीत आहेत. कारण कांद्याचे भाव सध्या गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेत तर अवघे २ रुपये किलो दरानं शेतकऱ्यांना कांदा विकण्याची वेळ आलीय. त्यामुळे खावं काय? मुलांना बाळगावं कसं? जगावं कसं? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत.

कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत असला तरी व्यापाऱ्यांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. वर्धा जिल्ह्यातील मुख्य भाजी मार्केट तसच इतर ठिकाणी कांद्याचा दर हा २० रुपये किलोपर्यत पोहचले आहेत. व्यापाऱ्यांना मात्र फटका बसत नाही. तो नेहमी फायद्यातच असतो. हे मात्र तितकेच खरे दरवर्षीप्रमाणे यंदाही कांदा शेतकऱ्यांना रडवतो आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारची शेती हिताची भाषा केवळ बेगडी असल्याने त्यावर कोणताही उपाय करण्यात येत नाही.यावर्षी खरीप हंगामात पाऊस उशिरा सुरू झाला आणि पुढे तो एक महिना अधिक पडत राहिला. परिणामी, कांद्याची लागवड उशिरा झाली. तो आता काढणीला आला आहे.

उन्हाचा वाढता तडाख्यामुळे मजूर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घरातील सदस्यांच्या मदतीने कांदा काढला मात्र, बाजारात कांद्याची आवक वाढल्याने भावात कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे आधी ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. कांद्याला सध्या २ रुपये ते ८ रुपयांचा दर मिळत आहे.