Home स्टोरी कस्तुरबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन राजाराम गवस यांना राष्ट्रपती पोलीस पदकांने...

कस्तुरबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन राजाराम गवस यांना राष्ट्रपती पोलीस पदकांने सन्मानित….!

254

दोडामार्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील पाटय पुनर्वसन सासोली येथील रहिवासी असलेले कस्तुरबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन राजाराम गवस यांना राष्ट्रपती पोलीस पदक त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल जाहीर झाले. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्याचे सुपुत्र असलेले सचिन गवस यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ठाण्यातील कस्तुरबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून सचिन गवस यांनी उत्कृष्ट अशी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते काम करत आहेत. त्यांचे वडील राजाराम गवस उर्फ राजा गवस हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. वडिलांचा आदर्श आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे पोलीस दलात सचिन गवस यांना हा मिळालेला राष्ट्रपती पदक पुरस्कार निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्याला भूषणा व हअसे आहे.

मुंबई पोलीस मध्ये महत्वपुर्ण कामगिरी केलेले, मुंबई पोलिसांच्या अनेक यशस्वी ऐतिहासिक मोहिमांमध्ये सहभागी असलेले एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सचिन राजाराम गवस यांची ओळख आहे. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेची नोंद घेत भारत सरकारचा राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांचा प्रजासत्ताक दिनी मुंबईत सन्मान गौरव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.