सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कुडाळ तालुक्यातील कसाल-धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे.यावेळी आ.वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे.
यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले आ.वैभव नाईक यांनी मतदारसंघात अनेक विकासात्मक व समाजोपयोगी कामे केली आहेत.आ.वैभव नाईक हेच आपल्या भागाचा विकास करू शकत असल्याने आम्ही आ.वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारले आहे. सर्वसामान्यांमध्ये वावरून सर्वसामान्यांच्या वेळे प्रसंगाला धावून जाणारे आपले आमदार आहेत यामुळेच आपण त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना पक्षाची मशाल हाती घेतली आहे येणाऱ्या काळात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी आपण जोमाने काम करू असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी स्वप्निल मोडक,अरुण वनकर,अजय खरात,सुरज जंगले, विठ्ठल मोडक,महेश कोळपटे या ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला आहे तसेच यावेळी युवासेना शाखा संघटक पदी स्वप्निल मोडक यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख सचिन कदम, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालणकर, बाळा कांदळकर,गणेश मेस्त्री, गिरीश मर्तल, रमेश कदम आदी शिवसैनिक उपस्थित होते.