मुंबई: मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेवानिवृत्त कार्यकर्ते व कवी श्यामसुंदर गावकर यांच्या ” पुन्हा एक शून्य “ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आज वाशी येथील योग विद्यानिकेतन सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक सौ. नमिता कीर, ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, पत्रकार प्रमोद कांदळगावकर, नवी मुंबई कोकण साहित्य परिषदेचे मोहन भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सभेचे सुंदर निवेदन सौ. दमयंती भोईर यांनी केले. याप्रसंगी शांताराम लोखंडे, मारुती विश्वासराव, रतनकुमार झाजम, हरिश्चंद्र पवार, आबा कोयंडे, अम्रोज सोज, लेखक कवी दिगंबर गावकर, उदय माळगावकर, लक्ष्मण गावकर, प्रभाकर गावकर, आदी मान्यवर, लेखक, कवी, नातेवाईक उपस्थित होते.