सावंवाडी प्रतिनिधी:
राष्ट्रीय छात्र सेनेच्या NCC वतीने राष्ट्रीय स्तरावरील एक भारत श्रेष्ठ भारत EBSB या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महाराष्ट्र आणि ओडिसा राज्यासाठी उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी भांबुरी जिल्हा जळगाव येथे दिनांक २७ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर या कालावधीसाठी करण्यात आले असून दोन्ही राज्यांच्या पारंपारिक, भाषिक, राहणीमान, खाद्य संस्कृती, भौगोलिक रचना, सांस्कृतिक विचारांची देवाण-घेवाण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने चालविलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत या मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिकांना देखील याबाबतचा परिचय व्हावा या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील शिबिराचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून या शिबिरासाठी छात्रसैनिकांची निवड झालेली आहे.
तसेच यांच्याबरोबर ओडिसा राज्यातील सुद्धा राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक सहभागी होणार आहेत यामधून शालेय विद्यार्थ्यांना बरेच भारतीय संस्कृतीचे बद्दल शिकण्यायोग्य ज्ञान प्राप्त होणार आहे.
यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता नववी मधील छात्र सैनिक कार्पोरल वरद चंद्रशेखर नाईक हा सहभागी होणार असून याची निवड ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन ओरोस सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्गचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक कुमार दयाळ यांनी केलेली आहे. या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी त्याला प्रशाळेचे एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचे मार्गदर्शन लाभले.
त्याच्या पुढील वाटचालीस त्याला सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष शैलेश पई सर्व पदाधिकारी संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघ तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी शुभेच्छा दिल्या.