Home स्टोरी कळसुलकर प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.

कळसुलकर प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.

190

सावंतवाडी: आज मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य ,थोर साहित्यिक वि .वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

इयत्ता तिसरीच्या मुलांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या अनेक अजरामर कविता सादर करून कार्यक्रमांमध्ये रंजकता आणली .या कार्यक्रमातून मातृभाषा, बालमनावरील संस्कार, अभिव्यक्ती, सभाधिटपणा या गुणांना चालना मिळाली. सदर कार्यक्रमात इयत्ता तिसरीच्या पन्नास मुलांनी सहभाग घेतला.

यावेळी वर्गशिक्षक श्री अमित कांबळे सर यांनी मराठी भाषेची गौरवगाथा सांगितली. तसेच मराठी भाषेचा इतिहास, मूल्ये, संस्कार यांची जपणूक करणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी आपल्या मनोगततातून विचार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत सर यांचे मुलांना प्रोत्साहन मिळाले व वर्गशिक्षक श्री. अमित कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.