Home शिक्षण कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांचे नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण.

कळसुलकर प्राथमिक शाळेच्या मुलांचे नरेंद्र डोंगर येथे वृक्षारोपण.

129

सावंतवाडी: येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा सावंतवाडी अर्थात कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज आनंददायी शनिवार निमित्त बी पेरणी व वृक्षारोपण हा कार्यक्रम नरेंद्र डोंगर येथे पार पाडला.

यावेळी या चिमुकल्या मुलांनी विविध झाडांच्या बिया तसेच आंबा,काजू, फणस, चिंच, जांभूळ, निरफणस या व अशा विविध झाडांची रोपे आणत वृक्षारोपण केले. सोबतच विविध झाडांच्या बिया मुलांनी जमिनीमध्ये पेरल्या. यातून वृक्ष लागवड होऊन हेच वृक्ष पुढे प्राणी-पक्षी यांचे आश्रयस्थान बनतील, पर्यायाने माणसालाही याचा फार मोठा उपयोग होईल, ही भावना मुलांच्या अंगी रुजवण्याचा प्रयत्न शाळेने केल्याचे दिसले.

 

यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमास सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या संचालिका नम्रता नेवगी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, पालक श्रीमती पडते, वर्गशिक्षक श्री डी.जी.वरक, श्री अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ, श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ श्रीमती संजना आडेलकर, श्रीमती स्मिता घाडीगावकर आदी शिक्षक उपस्थित होते.