सावंतवाडी प्रतिनिधी: काल रविवार दि. ५ ऑगस्ट रोजी शाळेच्या सभागृहात देशभक्तीपर समूहगीत गायनाच्या सरावासाठी आलेला इयत्ता नववी ब चा साईल महेश हवालदार या विद्यार्थ्यांने त्याला सापडलेले एक हजार रुपये आपल्या वर्ग शिक्षिका सौ बांदेलकर यांच्याकडे दिले. चौकशी केली असता शाळेत आलेल्या पाटणकर गॅस सर्विस चे श्री .सुनील तोरस्कर यांचे ते पैसे असल्याचे निदर्शनास आले. त्यांना बोलावून त्यांचें पैसे त्यांना सुपूर्द करण्यात आले. साईलच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी त्याचे ,वर्गशिक्षकांचे आणि शाळेचे कौतुक केले व आभार मानले. प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांनीही साईलचे खूप कौतुक केले आहे.