Home क्राईम कल्‍याण येथे शिक्षकाकडून ५ वर्षीय विद्यार्थ्‍यावर लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्न !

कल्‍याण येथे शिक्षकाकडून ५ वर्षीय विद्यार्थ्‍यावर लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्न !

188

कल्याण: कल्‍याण पूर्व भागातील एका नामांकित इंग्रजी शाळेतील शिक्षकाने ५ वर्षीय विद्यार्थ्‍यावर शाळेच्‍या शौचालयात लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे शिक्षक समीर कदम यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून त्‍यांना अटक करण्‍यात आली आहे.

 

या प्रकारामुळे विद्यार्थी घाबरला होता. त्‍याने घरी आल्‍यावर आई-वडिलांना याविषयी सांगितले. त्‍यांनी शाळेत जाऊन विचारपूस केल्‍यावर घटना घडल्‍याचे समोर आले. त्‍यानंतर शिक्षकांवर वरील कारवाई करण्‍यात आली.