Home स्टोरी कल्याण पूर्वेत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचा पहाणी दौरा

कल्याण पूर्वेत पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांचा पहाणी दौरा

183

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतील वाढत्या सार्वजनिक नागरी समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या पहाणी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यात पालिका आयुक्तांना विविध नागरी समस्या दाखवण्यात आल्या या दौर्‍यात संबंधीत पालिका अधिकारी वर्ग तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेतील लोक नियुक्त लोक प्रतिनिधींची सत्ता संपुष्ठात आल्यानंतर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष झाले आहे, त्यातून कल्याण पूर्वेतील चारही प्रभागात नागरी समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. या समस्यांच्या रोषाला माजी नगरसेवकांना सामोरे जावे लागत आहे . या करीता शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या पुढाकाराने या दौर्‍याचे आयोजन केले होते .या दौर्‍यात यु टाईप रस्त्याचे नियोजित रुंदीकरणा सह एकूण २७ रस्त्याच्या कामा बाबतची पहाणी, उल्हास नदीची पहाणी, लोकग्राम नाल्याची दुरावस्ता तसेच नाल्याचे रस्त्यावरील रुंदीकरण, अनेक ठिकाणच्या रस्त्यावरील मेन होलची झाकणे, पाण्याची गळती या सह पूणे लिंक रोड वरील बाधीत इमारती वरील प्रलंबीत निष्कासनाची कारवाई आदी नागरी समस्या आयुक्त महोदयांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. या पहाणी दौर्‍यात उपस्थित सहाय्यक आयुक्तांना अहवाल सादर करुन आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले. पहाणी दौर्‍यात प्रभाग ४ जे च्या सहाय्यक आयुक्त सौ सविता हिले, प्रभाग ५ ड चे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जगताप तसेच संबंधीत अधिकारी यांचे सह माजी नगरसेवक निलेश शिंदे, नवीन गवळी, विशाल पावशे, प्रमोद पिंगळे, तसेच शाखा प्रमुख प्रशांत बोटे, प्रशांत काळे, प्रशांत काळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.