Home स्पोर्ट कल्याण पूर्वेत निशिगंधा प्रा. लि. कंपनीने प्रायोजित केलेल्या भव्य कब्बड्डी स्पर्धेत कोनगावच्या...

कल्याण पूर्वेत निशिगंधा प्रा. लि. कंपनीने प्रायोजित केलेल्या भव्य कब्बड्डी स्पर्धेत कोनगावच्या चिरोबा क्रीडा मंडळाने बाजी मारली!

112

कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – कल्याण पूर्वेतील कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगणावर निशिगंधा प्रा . लि . या कंपनीने प्रायोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य ‘विश्वरत्न कब्बड्डी चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेतील अंतिम विजेता पदाचा मानकरी कोनगांवचा चिरोबा क्रीडा मंडळ ठरला असून उपविजेता पदाचा मान कल्याण पूर्वेतील नव तरुण क्रिडा मंडळाला मिळाला आहे. कल्याण पूर्व – डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष केतन रोकडे यांचे हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेल्या या ठाणे जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून एकूण ४२ संघांनी सहभाग घेतला होता .ठाणे जिल्हा कब्बड्डी एसोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य ब गटातील कब्बड्डी सामने बाद पद्धतीने खेळववीण्यात आले.

सलग तीन दिवसात चाललेल्या या सामन्यात अंतिम लढत कोनगांवच्या चिरोबा क्रीडा मंडळ आणि कल्याणच्या नव तरुण मंडळात होवून या अटीतटीच्या सामन्याने चिरोबा क्रीडा मंडळाने नव तरुण क्रिडा मंडळावर गुणांची आघाडी घेत विजय संपादन केला. अंतीम विजेता संघास रोख रक्कम रुपये २० हजार तर उप विजेता संघास रोख रक्कम रुपये १५ हजार तसेच प्रत्येकी आकर्षक सन्मान चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले .सामनावीर ठरलेल्या कब्बड्डी पटू ला सायकल तर उकृष्ठ पकड आणि उष्कृष्ठ खेळी खेळणाऱ्या कब्बड्डीपटूंनाही आकर्षक भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले .या समयी दलीत मित्र अण्णा रोकडे, माजी नगरसेवक महादेव रायभोळे, भिमराव डोळस, तसेच भारत सोनवणे, प्रो कब्बड्डी लिगचे स्टार कब्बड्डी पटू नितिन मोरे, श्रीकांत जाधव यांचे सह शेखर केदारे, केतन रोकडे, आकाश गायकवाड, सोनू कांबळे, रोहन केदारे, तुषार जाधव शिल्पा अंबादे, भारती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सामने यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ युवक मंडळाचे अध्यक्ष सागर निकम यांचेसहरोहन केदारे, आकाश गायकवाड, दिपक शिंदे, सुरेश केदारे, अमरदिप शिंदे, अमित गायकवाड , अनिकेत गायकवाड , सौरभ कांबळे , प्रतिक सोनवणे ,समीर गांगुर्डे , रितिक सोनवणे आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले . संपूर्ण सामने यशस्वीपणे पार पडण्यासाठी सिद्धार्थ युवक क्रीडा मंडळाचे मोलाचे असे सहकार्य लाभले .